अचूक अभियांत्रिकी आणि उत्पादन क्षेत्रातील कंपनी बालू फोर्ज इंडस्ट्रीज लिमिटेडने (बीएफआयएल), २१ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या तिच्या संचालक मंडळाच्या बैठकीत, ३० सप्टेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी लेखापरीक्षित एकत्रित आर्थिक निकालांना मान्यता दिली.
बीएफआयएलने वार्षिक ६०.१ टक्क्यांची मजबूत महसुली वाढ नोंदवली आणि परिचालनातून मिळणारा महसूल दुसऱ्या तिमाहीमध्ये ₹२२२.८७ कोटी राहिला, जो २०२३-२४ या गत आर्थिक वर्षातील याच तिमाहीमध्ये ₹१,३९.२२ कोटी होता. ग्राहक जोडण्यावर सतत लक्ष केंद्रित केल्याने आणि विशेष अभियांत्रिकी उत्पादनांची सतत मागणीतून ही वाढ शक्य झाली.
ढोबळ उत्पन्न (व्याज, कर, घसारा व कर्जफेडीपूर्वी) ११६.५ टक्क्यांनी वाढला आणि नफ्याचे मार्जिन आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या दुसऱ्या तिमाहीतील २१.६ टक्क्यांवरून, २०२४-२५ च्या दुसऱ्या तिमाहीत २९.३ टक्क्यांपर्यंत म्हणजेच ७६३ आधारबिंदूंनी वाढले. व्यावसायिक परिचालनाचे प्रमाण वाढले आणि जड उत्पादनांची मागणी वाढल्यामुळे चांगले मार्जिन मिळू शकले.
करोत्तर नफा १०६.९ टक्क्यांनी वाढला आणि करोत्तर नफ्याचे मार्जिन आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या दुसऱ्या तिमाहीतील १६.७ टक्क्यांवरून, २०२४-२५ च्या दुसऱ्या तिमाहीत २१.७ टक्के असे ४८९ आधारबिंदूंनी सुधारले.
आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या दुसऱ्या तिमाहीच्या कामगिरीवर भाष्य करताना, बीएफआयएलचे कार्यकारी संचालक श्री त्रिमान चंडोक म्हणाले “भारतीय अचूक अभियांत्रिकी उद्योग त्याच्या पुढील महत्त्वपूर्ण वाढीच्या टप्प्यावर आहे, जलद परिवर्तनामुळे, पुरवठा साखळीतील जोखीम कमी करण्यासाठी कंपन्यांनी जागतिक स्तरावर चायना प्लस वन अर्थात चीनला पर्यायाचे धोरण स्वीकारले आहे.
या धोरणात्मक संक्रमणाने, व्यापक उद्योग बदलांसह, अनेक संधींची दालने उघडली आहेत आणि दीर्घकालीन वाढीचा मार्ग त्यांनी मोकळा केला आहे. या गतीचा पूर्ण फायदा घेण्यासाठी, आमच्या क्षमतांना बळकट करण्यासाठी, नजीकच्या भविष्यात मजबूत, सकारात्मक परिणामांसाठी स्वतःला पूर्णपणे तयार करण्यासाठी आम्ही भरीव गुंतवणूक करत आहोत.
आर्थिक उपलब्धी व्यतिरिक्त, चालू तिमाहीत वेगाने विकसित होत असलेल्या बाजारपेठेत स्पर्धात्मक स्थान टिकवून ठेऊन, उद्योग क्षेत्रातील आव्हानांमधून तरून जाण्यासाठी आणि नवीन संधींचा फायदा घेण्यासाठी आम्ही आमच्या क्षमता बळकट करण्यावर लक्ष केंद्रित केलेल्या खालील अनेक गोष्टी योजल्या आहेत:
कंपनीकडे सध्याच्या पायाभूत सुविधांसाठी मजबूत कार्यादेश (ऑर्डर बुक) आहेत आणि येत्या तिमाहीत नियोजित पायाभूत सुविधांचे व्यावसायिकीकरण होण्याची अपेक्षा आहे. ऑर्डर बुकच्या दृष्टीने ३२,००० टन मशीनिंग क्षमतेचा पूर्ण वापर केला जाईल आणि मर्सिडीज बेंझ उत्पादन लाइनची क्षमता तसेच मशीनिंग क्षमतेच्या विस्ताराची पूर्तता करण्यासाठी प्रारंभिक व्यापारीकरणातून फोर्जिंग आउटपुटमध्ये देखील स्पष्ट दृश्यमानता आहे.
कंपनीकडे ७२,००० टन फोर्जिंग क्षमतेची स्पष्ट दृश्यमानता देखील आहे ज्यात रेल्वे, संरक्षण आणि एरोस्पेसच्या या सारख्या उच्च श्रेणीच्या विशिष्ट विभागामध्ये कंपनीने करार केले आहेत. आम्ही आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या प्रथम सहामाहीमध्ये आमच्या सुविधांमध्ये पहिले ७ अॅक्सिस सीएनसी मशीन विकत घेतले आणि कार्यान्वित केले आहे.
आम्ही २०२३-२४ च्या प्रथम सहामाहीमधील १३७ दिवसांपासून, आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या प्रथम सहामाहीतील १०६ दिवसांपर्यंत खेळत्या भांडवलाचे चक्र लक्षणीयरीत्या कमी केले आहे. याचा कंपनीच्या आर्थिक आरोग्यावर आणि कार्यक्षमतेवर परिवर्तनीय परिणाम झाला. मालसाठ्याचे व्यवस्थापन (इन्व्हेंटरी मॅनेजमेंट) उच्चतम राखून, सहजसाध्य प्रक्रिया वाढवून आणि देय बाबी सुव्यवस्थित करून, कंपनीने अधिक संतुलित आणि कार्यक्षम भांडवल संरचना प्राप्त केली आहे.
प्राप्तीयोग्य व्यवस्थापन वाढवल्याने थेट तरलता सुधारली आहे, ज्यामुळे कंपनीला रोखीची मजबूत स्थिती राखणे शक्य झाले आहे. कर्जदायीत्व दिवसांमध्ये घट म्हणजे पुनर्गुंतवणुकीसाठी निधी उपलब्ध झाला आहे, बाह्य वित्तपुरवठ्याची गरज आणि पर्यायाने संबंधित खर्चाची आवश्यकता कमी केली गेली आहे. एकूणच, या सुधारणांमुळे कंपनीची आर्थिक स्थिती उत्तम स्थिरावली, इतकेच नाही तर या क्षेत्रातील स्पर्धात्मक धारही वाढली आहे.
आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या प्रथम सहामाहीमधील १७७ दिवसांपासून, आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या प्रथम सहामाहीतील ११९ दिवसांपर्यंत कर्जदायीत्व दिवसांमध्ये यशस्वी कपात केल्याने कंपनीच्या आर्थिक आरोग्यावर आणि परिचालनात्मक कार्यक्षमतेवर परिवर्तनीय प्रभाव पडला आहे.
कंपनीने आपला रोख प्रवाह लक्षणीयरीत्या सुधारला आहे आणि म्हणूनच आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या प्रथम सहामाहीत ती एक सकारात्मक रोख प्रवाह कंपनी बनली आहे.
मालसाठ्यांच्या (इन्व्हेंटरी) व्यवस्थापनातील सर्वसमावेशक सुधारणांमुळे कंपनीला शाश्वत यश मिळाले आहे. कमी खर्च, सुधारित उत्पादन टाइमलाइन, वर्धित ग्राहक समाधान आणि अधिक चपळ पुरवठा साखळी यांच्या संयोजनाने भविष्यातील वाढीसाठी एक भक्कम पाया तयार केला आहे.
कंपनीने केवळ प्रमुख आणि महत्त्वाच्या भूमिकांमध्ये संघाचा विस्तार करण्याचे उद्दिष्ट ठेवले नाही तर येत्या आर्थिक वर्षात १,००० हून अधिक कर्मचाऱ्यांपर्यंत त्यांचे कर्मचारी वर्ग वाढवण्याची योजनाही आहे. आमचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्याकडून संकल्पित विकसित भारत २०४७ अंतर्गत पायाभूत सुविधांच्या विकासाला दिल्या जात असलेल्या चालनेतून नवीन उत्पादन विकास, नवीन भौतिक रसायने आणि उदयोन्मुख क्षेत्रातील विस्तारासाठी संशोधन आणि विकास प्रयासांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल.
शेवटी, कमी खर्च, सुधारित उत्पादन वेळापत्रक, वर्धित ग्राहक समाधान आणि अधिक चपळ पुरवठा साखळी यांच्या संयोजनाने भविष्यातील वाढीसाठी एक भक्कम पाया कंपनीने तयार केला आहे.”