शालेय विद्यार्थ्यांना जेवण देण्यासाठी ॲमवे इंडिया आणि अक्षयपात्र फाऊंडेशन एकत्र येऊन काम करणार

Admin

Amway India Joins Hands with The Akshaya Patra Foundation to provide meals to school children  ॲमवे

आरोग्याप्रती बांधिलकी ठेवून न्यूट्रिलाईटने 90 वर्षे पूर्ण केलीत : 90,000 पौष्टिक आहार पुरवित आहे आणि सरकारी शाळांमध्ये पोषण व स्वच्छता संबंधी कार्यशाळा आयोजित करत आहे

ॲमवे इंडिया ही आरोग्य आणि कल्याणाच्या गरजा पूर्ण करणारी एक अग्रगण्य कंपनी आहे. भारतातील प्रतिकूल परिस्थितीतील मुलांना एक आरोग्यदायी भवितव्य देण्याच्या दृष्टीने एक परिवर्तनकारी उपक्रमाच्या माध्यमातून बालकुपोषणाच्या गंभीर समस्या हाताळत आहे. महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारतातील 7.7% मुले (सुमारे 43 लाख) कुपोषित आहेत आणि त्याद्वारे सरकार पोषण परिणाम सुधारण्याच्या प्रयत्नांना प्राधान्य देत असलेली एक गंभीर समस्या स्पष्ट करत आहे.

ॲमवेने बालपणातील कुपोषणाच्या कारणासाठी बांधिलकी स्वीकारलेली असून न्यूट्रिलाईटच्या 90व्या वर्धापन दिनाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून वितरकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने सरकारी शाळांमधील मुलांसाठी 90,000 हून अधिक पौष्टिक जेवण देण्यासाठी द अक्षयपात्रा फाऊंडेशन सोबत सहकार्य केले आहे.

बालदिनाचे औचित्य साधून या उपक्रमाने शैक्षणिक सत्रांसोबत पुढे विस्तार करून विद्यार्थ्यांना पोषण, स्वच्छता, मानसिक आरोग्य आणि संतुलित आहार यांच्याविषयी माहिती दिली. ॲमवेच्या स्वयंसेवकांनी सक्रिय रूपाने भाग घेऊन मुलांना पौष्टिक जेवण दिले. दिल्ली, जयपूर, भुवनेश्वर, गुवाहाटी, पुणे, अहमदाबाद, बंगळुरू आणि चेन्नई या आठ महत्त्वाच्या ठिकाणी हा प्रभावी उपक्रम राबविण्यात आला आणि त्याद्वारे उज्ज्वल भविष्यासाठी सार्थक बदल घडवून आणण्याचे त्याचे उद्देश होते.

श्री. रजनीश चोप्रा, व्यवस्थापकीय संचालक, ॲमवे इंडिया बालदिनाच्या उपक्रमाविषयी म्हणाले, “न्यूट्रिलाईट नऊ दशकांपासून आमचा फ्लॅगशिप पोषण ब्रँड आहे आणि इष्टतम आरोग्य व कल्याणास प्रोत्साहन देऊन लोकांना आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी प्रेरित करीत आहे. न्यूट्रिलाईटच्या 90 व्या वर्धापन दिनानिमित्त आमच्या वितरकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या पाठिंब्याने आम्ही अभिमानाने द अक्षयपात्रा फाऊंडेशन सोबत सहकार्य करीत आहोत आणि सरकारी शाळांमधील मुलांना आवश्यक पोषणसंबंधी शिक्षण देण्याबरोबरच 90,000 हून अधिक पौष्टिक जेवण उपलब्ध करून देत आहोत.

या उपक्रमाच्या माध्यमातून, विद्यार्थी आरोग्यदायी निवडी करण्याबद्दल मौल्यवान ज्ञान कमावतात. या आरोग्यदायी निवडीमध्ये संतुलित आहार, मानसिक आरोग्य आणि स्वच्छतेच्या पद्धतींचा समावेश केला असून ते विद्यार्थ्यांना उज्ज्वल, आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी सबल करते. योग्य पोषण हाच युवांच्या वाढीचा आणि यशाचा पायंडा आहे, असे आम्ही ठामपणे मानतो. कुपोषणाच्या जागतिक ओझ्यामध्ये भारताचा एक तृतीयांश वाटा असणाऱ्या देशात पुरेशा पोषणाद्वारे मुलांचे संगोपन करणे फक्त महत्त्वाचे नसून ते अत्यावश्यक आहे. यासाठी चांगल्या भविष्यासाठी आरोग्यदायी राष्ट्र उभारणीच्या आमच्या बांधिलकीवर आम्ही अढळ आहोत.”

या प्रसंगी भाष्य करताना, अक्षय पात्रा फाऊंडेशनचे सीईओ श्रीधर व्यंकट, म्हणाले, “आम्ही पुन्हा एकदा ॲमवे इंडियासोबत आनंदाने सहकार्य करीत आहोत. त्यांच्या उदार पाठिंब्यामुळे आम्हाला सरकारी शाळेतील मुलांना देशभरातील आमच्या 72 स्वयंपाकघरांमधून 90,000 हून अधिक पौष्टिक जेवण देता येईल. ही भागीदारी मुलांना खाऊ घालण्यापलीकडे जाऊन पुढच्या पिढीचे आरोग्यदायी भवितव्य सुनिश्चित करण्यास मदत करत आहे. आम्ही भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचे आणि राज्य सरकारांचे त्यांनी दिलेल्या अखंड पाठिंब्याबद्दल मनापासून आभारी आहोत कारण यामुळे आम्हाला देशभरातील मुलांचे पोषण देणे सुरू ठेवता येणार आहे.”

ॲमवे इंडियाचे आरोग्य आणि कल्याण संबंधी दृष्टिकोन भारत सरकारच्या आरोग्यदायी राष्ट्राच्या उभारणीच्या ध्येयाशी सुसंगत असून ॲमवे  इंडियाचे प्रयत्न आणि उपक्रम त्यास जोडलेले आहेत. चांगल्या पोषणाला प्रोत्साहन देण्यासाठी अक्षय पात्रासोबत भागीदारी करण्याव्यतिरिक्त, या बाल दिनी ॲमवेने आपल्या पॉवर ऑफ 5 प्रोग्राम पार्टनर चाइल्डफंड इंडियाच्या सहकार्याने मुंबई, कोलकाता आणि लखनौ येथील कार्यक्रम स्थळांवर तसेच त्याच्या ग्राम आरोग्य कार्यक्रम भागीदार, डिंडीगुल जिल्ह्यातील एस आर ट्रस्ट (मीनाक्षी मिशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर) च्या सहकार्याने “दयाळूपणे खाऊ घाला – पौष्टिक अन्नाची तयारी आणि वितरण” या संकल्पनेखाली जनजागृती उपक्रमांचे आयोजन केले आहे आणि त्याच्या माध्यमातून पोषण आणि सामुदायिक समर्थनाचे महत्त्व वाढवत आहे.

पोषणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी ॲमवे अक्षय पात्रा फाऊंडेशनशी दीर्घकाळापासून जुडलेले आहे. यामध्ये 2022 मध्ये 1,600 विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देणे आणि प्रतिकूल परिस्थितीतील मुलांसाठी पोषण शिक्षण सत्र आयोजित करणे सामील आहे. 2021 मध्ये, कोव्हिड मुक्ती प्रयत्नांचा भागाच्या रूपात ॲमवेने आपल्या वितरकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने गुरुग्राम, ठाणे, पनवेल, चेन्नई आणि भुवनेश्वर या ठिकाणी हजारो आहारांचे किट्स वितरित केले होते आणि महामारीने बाधित 10,000 हून अधिक लोकांशी संपर्क साधला होता .

Leave a Comment