- एयर इंडियाने डायमंड एयरक्राफ्टकडे ३१ सिंगल इंजिन पायपर एयरक्राफ्ट आणि ३ ट्विन- इंजिन एयरक्राफ्टची ऑर्डर दिली आहे.
- एयरक्राफ्टचे वितरण २०२५ मध्ये सुरू होणार असून त्यामुळे एयर इंडियाची भविष्यात भारताच्या विमानवाहतूक क्षेत्राला बळकटी देण्याची बांधिलकी अधोरेखित झाली आहे
एयर इंडिया या भारतातील आघाडीच्या विमानवाहतूक कंपनीने ३४ ट्रेनर एयरक्राफ्टची ऑर्डर दिली आहे. ही ऑर्डर अमरावती, महाराष्ट्र येथे कंपनीतर्फे उभारल्या जात असलेल्या दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन (एफटीओ) देण्यात आली आहे. हे एफटीओ नियामक मान्यता मिळाल्यावर २०२५ च्या दुसऱ्या सहामाहीत कार्यान्वित होईल.
या ऑर्डरमध्ये अमेरिकेतील पायपर एयरक्राफ्टकडून मागवण्यात आलेली ३१ सिंगल इंजिन एयरक्राफ्ट्स आणि ऑस्ट्रियातील डायमंड एयरक्राफ्टच्या ३ ट्विन इंजिन एयरक्राफ्ट्सचा समावेश आहे.
या एफटीओमुळे एयर इंडियाच्या Vihaan.AI या ट्रान्सफर्मेशन प्रोग्रॅमचा एक भाग म्हणून देशातील प्रशिक्षण सुविधा बळकट करण्याची बांधिलकी आणखी मजबूत झाली आहे. यामुळे फ्लीटच्या विस्ताराबरोबरच मोठ्या संख्येने पायलट्स तयार केले जातील व स्वयंपूर्णता साध्य होईल. एफटीओ अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर उभारले जात असून त्याद्वारे दरवर्षी १८० कमर्शियल पायलट्स तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.
‘नवीन एफटीओ हे प्रशिक्षणाशी संबंधित पायाभूत सुविधा विस्तारण्याच्या दिशेने उचललेले धोरणात्मक पाऊल असून त्याद्वारे एयर इंडिया तसेच भारतीय विमानवाहतूक उद्योगासाठी प्रशिक्षित पायलट्सची स्वयंपूर्ण यंत्रणा तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. या ऑर्डरमुळे दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या फ्लाइंग ट्रेनिंग संस्थेसाठी ३४ ट्रेनर एयरक्राफ्टची मदत होणार आहे. जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेली विमानवाहतूक कंपनी या नात्याने भारतासाठी गरजेच्या विमानवाहतूक सुविधा उभारण्यात महत्त्वाची भूमिका निभावताना आणि सरकारच्या आत्मनिर्भर भारत धोरणाला हातभार लावताना आम्हाला आनंद होत आहे,’ असे एव्हिएशन अकॅडमीचे संचालक सुनील भास्करन म्हणाले.
विमानवाहतूक प्रशिक्षणात गुंतवणूक करण्याच्या बांधिलकीचा एक भाग म्हणून एयर इंडियाने नवीन एव्हिएशन ट्रेनिंग अकॅडमी सुरू केली आहे. गुरुग्राम येथे ६००,००० चौरस फुट जागेत वसलेली ही अकॅडमी दक्षिण आशियातील सर्वात मोठी आहे. त्याशिवाय एफटीओची घोषणा करणारी भारतातील पहिलीच विमानवाहतूक कंपनी असून त्यामुळे नजीकच्या भविष्यात भारताच्या विमानवाहतूक यंत्रणेला बळकटी देण्याची एयर इंडियाची बांधिलकी अधोरेखित झाली आहे.
अमरावती येथील एफटीओमध्ये एयर इंडिया १० एकर जागेवर अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र उभारत आहे. या जागेत डिजिटल तंत्रज्ञान असलेले वर्ग, जागतिक स्तरावरील अभ्यासक्रम, हॉस्टेल्स, डिजिटाइज्ड ऑपरेशन्स सेंटर, देखभाल सुविधा यांचा समावेश असेल. हे एफटीओ सुरक्षेच्या उच्च मापदंडाचे पालन करून सर्वोत्तम प्रशिक्षण देण्याच्या हेतूने डिझाइन करण्यात आले आहे.