- गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (जीईएम) भारतातील एक-थांबा, राष्ट्रीय प्रोक्यूरमेंट ई-पोर्टल आहे
- सार्वजनिक वस्तू व सेवांच्या ऑनलाइन खरेदीची सुविधा
- ग्राहकांमध्ये केंद्र व राज्य सरकार मंत्रालये, विभाग, केंद्र व राज्य सार्वजनिक क्षेत्र उद्यम, स्वायत्त संस्था आणि स्थानिक सरकारी संस्थांचा समावेश आहे
- जीईएम डिजिटलायझेशन आणि ऑटोमेशनच्या माध्यमातून सार्वजनिक खरेदीमधील कार्यक्षमता, पारदर्शकता व सर्वसमावेशकता वाढवणार
- ई-बिडिंग, ई-ऑक्शन, रिव्हर्स ई-ऑक्शन आणि मागणी एकीकरण सुविधा देते
- वर उल्लेख करण्यात आलेल्या सरकारी विभागांना जीईएम पोर्टलच्या माध्यमातून प्रत्यक्ष स्कोडा ऑटो इंडिया कार्स खरेदी करण्याची सुविधा आहे
- कुशक आणि स्लाव्हिया या जीईएमच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या कार्स आहेत
- मेड-इन-इंडिया उत्पादनांना चालना देणार
भारतातील बाजारपेठेत विकास व विस्तारीकरणाच्या दिशेने वाटचाल करत स्कोडा ऑटो इंडियाने आपल्या निवडक कार्ससाठी विक्रेती म्हणून गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (जीईएम) पोर्टलवर स्वत:ची नोंदणी केली आहे. जीईएम या आर्थिक वर्ष अखेरपर्यंत दक्षिण कोरियाच्या कोनेप्सला (KONEPS) पार करत जगातील सर्वात मोठे सरकारी ई-प्रोक्यूरमेंट पोर्टल बनण्यास सज्ज आहे. जीईएम पोर्टलच्या माध्यमातून सरकारी ग्राहकाला पहिली स्कोडा वितरित करण्यात आली आहे.
प्लॅटफॉर्म
जीईएम पोर्टल सरकारी ग्राहकांसाठी राष्ट्रीय सार्वजनिक खरेदी पोर्टल आहे. हे एण्ड-टू-एण्ड ऑनलाइन मार्केटप्लेस आहे, जे केंद्र व राज्य मंत्रालये, विभाग, केंद्र व राज्य सार्वजनिक उद्यम, स्वायत्त संस्था आणि स्थानिक सरकारी संस्थांच्या माध्यमातून वस्तू व सेवांची खरेदी सुविधा देते. हे पोर्टल वाणिज्य व उद्योग मंत्रालय, भारत सरकारच्या अखत्यारित आहे.
जीईएम पेपरलेस, कॅशलेस व कॉन्टॅक्टलेस इकोसिस्टम देते, जेथे सरकारी ग्राहक ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भारतभरातील विक्रेते आणि सेवा प्रदात्यांकडून प्रत्यक्ष उत्पादने व सेवा खरेदी करू शकतात. प्लॅटफॉर्म भारतातील सार्वजनिक खरेदी यंत्रणांना नवीन रूप देण्यासाठी डिजिटलायझेशन व ऑटोमेशनसह चपळता आणि गतीचा वापर करते.
सोयीसुविधा आणि पारदर्शकता
जीईएमचा सार्वजनिक खरेदीमध्ये पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सर्वसमावेशकता वाढवण्याचा मनसुबा आहे. प्लॅटफॉर्म ई-बिडिंग, ई-ऑक्शन, रिव्हर्स ई-ऑक्शन आणि मागणी एकीकरण सुविधा देते.
पोर्टल सरकारी विभागांना जीईएम पोर्टलवर सूचीबद्ध केलेल्या स्कोडा ऑटो इंडियाच्या ताफ्यामधील त्यांच्या कार्स खरेदी करण्याची सुविधा देते, तसेच स्कोडा ऑटो इंडियाच्या मेड-इन-इंडिया उत्पादनांचे प्रमोशन देखील करते. जीईएमच्या माध्यमातून सरकारी ग्राहकाला स्कोडाची पहिली डिलिव्हरी करण्यात आली आहे.
जीईएम स्कोडा
स्कोडा ऑटो इंडिया कार्सच्या पूर्णत: चाचणी केलेल्या ५-स्टार सुरक्षित ताफ्यासह सुसज्ज आहे. मेड-इन-इंडिया कुशक आणि स्लाव्हिया सध्या जीईएम पोर्टलवर उपलब्ध असलेल्या कार्स आहेत.
दोन्ही कार्स विशेषत: भारतातील बाजारपेठेसाठी भारतातील व झेकमधील टीम्सने विकसित केलेल्या एमक्यूबी-एओ-इन प्लॅटफॉर्मवर आधारित आहेत, तसेच भारतामधून इतर देशांमध्ये देखील निर्यात केल्या जातात. या दोन्ही कार्सना ग्लोबल एनसीएपीच्या नवीन टेस्ट प्रोटोकॉल्सअंतर्गत प्रौढ व्यक्ती आणि मुलांसाठी संपूर्ण ५-स्टार मिळाले आहे.
कुशक एसयूव्ही आणि स्लाव्हिया सेदानमध्ये १.० टीएसआय व १.५ टीएसआय इंजिनची शक्ती आहे, जे सिक्स-स्पीड-मॅन्युअल किंवा सिक्स-स्पीड ऑटोमॅटिक किंवा सेव्हन-स्पीड डीएसजी ट्रान्समिशनसाठी डिझाइन करण्यात आले आहेत.