- ७५५० एमएएच क्षमतेची विशाल बॅटरी आणि ७.९९ मिमी जाडी असलेला भारतातील सर्वात स्लिम फोन.
- ९० वॅट टर्बो चार्जिंग आणि २२.५ वॅट रिव्हर्स चार्जिंग.
- ऑल पॉवर. नो बीएससह स्नॅपड्रॅगन ८एस जेन ४ चिपसेट, जी २.१ दशलक्षहून अधिक अंतूतू स्कोअर देते.
पोको हा भारतातील आघाडीचा कार्यक्षमता-संचालित ग्राहक तंत्रज्ञान ब्रँड त्यांच्या एफ-सिरीजमधील नवीन स्मार्टफोन ‘पोको एफ७’सह पुन्हा एकदा स्मार्टफोन युजर अनुभवाला नव्या उंचीवर घेऊन जाण्यास सज्ज आहे. तंत्रज्ञान उत्साही आणि नेहमी व्यस्त असलेल्यांसाठी डिझाइन करण्यात आलेल्या या स्मार्टफोनमध्ये भावी डिझाइन, उच्च कार्यक्षमता आणि प्रगत बॅटरी आहे, जे एकाच स्लीक पॅकेजमध्ये आहे.
पोको एफ७ मध्ये विशाल ७५५० एमएएच क्षमतेची बॅटरी आहे, जी भारतातील सर्वात मोठी बॅटरी आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये सुधारित ऊर्जा घनता आणि दीर्घकालीन कार्यक्षमतेसाठी सिलिकॉन कार्बन इनोव्हेशन आहे. या बॅटरीला फ्लॅगशिप-लेव्हल ९० वॅट टर्बो चार्जिंग आणि २२.५ वॅट रिव्हर्स चार्जिंगचे पाठबळ आहे. यामधून वापरकर्ते दिवसभर आणि त्यापेक्षा अधिक काळ स्मार्टफोन वापरू शकण्याची खात्री मिळते. उल्लेखनीय बाब म्हणजे या स्मार्टफोनची जाडी ७.९९ मिमी आहे, ज्यामुळे हा मोठी बॅटरी असलेला भारतातील सर्वात स्लिम फोन आहे.
२९,९९९ रूपये किंमत असलेल्या एफ७ सह पोको पुन्हा एकदा सेगमेंटमधील सर्वाधिक कार्यक्षमतेला प्राधान्य देत आहे. या स्मार्टफोनमधील स्नॅपड्रॅगन ८एस जेन ४ चिपसेट २.१ दशलक्षहून अधिक अंतूतू स्कोअर देते, जे त्यांच्या श्रेणीमधील अद्वितीय आहे. एलपीडीडीआर५एक्स मेमरी, यूएफएस ४.१ स्टोरेज आणि जवळपास २४ जीबी (१२ जीबी + १२ जीबी) टूर्बो रॅम असलेला हा स्मार्टफोन त्याच्या सेगमेंटमध्ये मापदंड स्थापित करतो. पोकोचे कस्टम-बिल्ट हायपरओएस २.० सह एआय सूट विनासायास, अनुकूल अनुभवाची खात्री देते. संपूर्ण ए७२० बिग-कोअर आर्किटेक्चर असलेली नवीन आइसलूप कूलिंग सिस्टम दीर्घकाळपर्यंत वापरादरम्यान स्मार्टफोन गरम होण्यावर नियंत्रण ठेवते.
या स्मार्टफोनमध्ये ६.८६ इंच १.५के एएमओएलईडी डिस्प्लेसह १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि अत्यंत अरूंद बेझल्स आहेत, ज्यामुळे हा सेगमेंटमधील सर्वात मोठे व सर्वोत्तम डिस्प्ले आहे, जे गेमिंग, कन्टेन्ट स्ट्रिमिंग आणि सर्जनशील कामासाठी परिपूर्ण आहे.
नवीन लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोनबाबत मत व्यक्त करत पोको इंडियाचे कंट्री हेड हिमांशू टंडन म्हणाले, ”पोको एफ७ सह आम्ही समुदायासाठी सर्वात महत्त्वाचे असलेले वैशिष्ट्य म्हणजे सर्वोत्तम, तडजोड न करणाऱ्या कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित केले आहे. मोठी बॅटरी किंवा फास्ट चार्जिंग पुरेसे नाही तर वापरकर्त्यांना फ्लॅगशिप कार्यक्षमता, आकर्षक डिझाइन, टिकाऊपणा आणि सर्वोत्तम व्हिज्युअल्सचा अनुभव देणे देखील महत्त्वाचे आहे, जे एकाच स्लीक, किफायतशीर स्मार्टफोनमध्ये येतात. एफ७ कार्यक्षम स्मार्टफोन आहे, ज्याची भारतातील ग्राहक उत्सुकतेने वाट पाहत होते.”
एफ७ ला सर्वोत्तम ठरवणारी वैशिष्ट्ये:
- स्नॅपड्रॅगन® ८एस जेन ४ – २.१ दशलक्षहून अधिक अंतूतू स्कोअर आणि उच्च स्तरीय प्रक्रिया व कार्यक्षमतेसाठी संपूर्ण ए७२० आर्किटेक्चर.
- भारतातील सर्वात मोठी बॅटरी – ७५५० एमएएच सिलिकॉन कार्बन बॅटरी – मोठ्या क्षमतेची बॅटरी, जी दीर्घकाळपर्यंत कार्यरत राहते आणि ९० वॅट फास्ट चार्जिंग व २२.५ वॅट रिव्हर्स चार्जिंगच्या माध्यमातून जलदपणे चार्ज होते.
- भारतातील सर्वात स्लिम फोनसह ७५५० एमएएच बॅटरी – फक्त ७.९९ मिमी जाडीसह आयपी६६, आयपी६८ आणि आयपी६९ टिकाऊपणा संरक्षण.
- सर्वोत्तम थर्मल व्यवस्थापन – एफ७ मध्ये स्थिर फ्रेम रेट्स आणि कमी लेटण्सीच्या खात्रीसाठी आइसलूप कूलिंग सिस्टम आहे.
- प्रीमियम ग्लास व मेटल डिझाइन – दोन्ही बाजूला कॉर्निंग® गोरिला® ग्लास ७आय संरक्षण आणि आकर्षक लुकसाठी फ्लॅशी, लक्षवेधक कॅमेरा डेको.
- जवळपास २४ जीबी टर्बो (१२ जीबी + १२ जीबी व्हर्च्युअल रॅम) + यूएफएस ४.१ – अद्वितीय मल्टीटास्किंग आणि गतीशीलपणे अॅप लोड होण्यासाठी नेक्स्ट-जनरेशन मेमरी व स्टोरेज.
- ६.८३ इंच १.५के एएमओएलईडी डिस्प्लेसह १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट – सर्वोत्तम व्हिज्युअल्ससाठी अल्ट्रा-स्लिम बेझल्ससह सेगमेंटमधील सर्वात मोठा डिस्प्ले.
- ५० मेगापिक्सल सोनी आयएमएक्स८८२ कॅमेरासह ओआयएस + २० मेगापिक्सल सेल्फी – आकर्षक, वास्तविक इमेजेससाठी अल्ट्रा स्नॅपशॉट मोड असलेले फ्लॅगशिप कॅमेरा सेटअप.
उपलब्धता आणि लाँच ऑफर्स
पोको एफ७ ची विक्री १ जुलैपासून फक्त फ्लिपकार्टवर सुरू होईल, जेथे १२+२५६ जीबी व्हेरिएण्टसाठी किंमत २९,९९९ रूपये आणि १२+५१२ जीबी व्हेरिएण्टसाठी किंमत ३१,९९९ रूपये आहे. फर्स्ट सेल डे ऑफरचा भाग म्हणून ग्राहक एचडीएफसी, एसबीआय किंवा आयसीआयसीआय बँक कार्ड्सचा वापर करत २,००० रूपयांची त्वरित बँक सूटचा, तसेच २,००० रूपये एक्स्चेंज बोनसचा आनंद घेऊ शकतात, जे बँक ऑफरसह स्वतंत्रपणे किंवा एकत्रित मिळू शकतात. याव्यतिरिक्त, पोको १०,००० रूपयांचे १-वर्ष मोफत स्क्रिन डॅमेज प्रोटेक्शन आणि १-वर्ष विस्तारित वॉरंटी देत आहे, ज्यामुळे एकूण वॉरंटी कव्हरेज २ वर्षांपर्यंत आहे. हे लाँच डे फायदे फक्त १ जुलै रोजी डिवाईस खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आहेत. यामुळे पोको एफ७ कार्यक्षम पॉवरहाऊस असण्यासोबत त्याच्या श्रेणीमधील सर्वोत्तम डिल देखील आहे.