प्रख्यात गायक मोहंमद रफ़ी यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे, याचेच औचित्य साधून पुण्यातील प्रयोगशील आयोजक झळकी नागण्णा यांनी “मूड्स ऑफ रफ़ी” हा मोहम्मद रफ़ी विशेष सुमधूर गीतांचा कार्यक्रमाचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी केले होते.
या ठिकाणी रफी यांनी गायलेली अजरामर गीते सादर करण्यात आली. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण सुप्रसिद्ध गायक “गफार जी मोमीन” हे होते. ज्यांना आपण “व्हॉइस ऑफ रफ़ी” म्हणून देखील ओळखतो. या कार्यक्रमात त्यांनी युगल गीते सादर करण्यात आली होती. सदरील कार्यक्रमाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
यावेळी साधना शर्मा, अश्विनी बिरारी, स्वाती पटवर्धन, केतकी जाधव, प्राची दातार, शारदा मिश्रा, सुनिता कुलकर्णी, स्मिता गिरमे, मीनाक्षी जोशी, अनघा चिंचवडकर, संगीता खरवडे, साधना कुर्लेकर व बाल कलाकार अयुधा बिरारी यांनी सुरेल साथ दिली. सदरील कार्यक्रमाचे निवेदन मनीष गोखले यांनी केले तर या कार्यक्रमाला शैलेश घावटे यांचे ध्वनी संयोजन, एस.आर.निर्मित यांचा सहयोग व विक्रम क्रिएशन यांचे तंत्र सहाय्य लाभले.
झळकी नागण्णा म्हणाले की “मैं जिंदगी का साथ निभाता चला गया” हे गाणे म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनाचा सार आहे हे गाणे ऐकत असताना आपल्यासमोर येतो तो एक हसतमुख चेहरा आणि भावनाप्रधान आवाज या गाण्यातील आवाजाचे लहान मुलांपासून आबाल वृद्धांपर्यंत असंख्य चाहते आहेत.
स्वर्गीय रफ़ीनीं एकूण २८ हजार गीते गायली आहेत. एखाद्या व्यक्तीला लोकांनी शंभर वर्ष लक्षात ठेवणे ही फार मोठी गोष्ट आहे. यशाच्या कितीही उंच शिखरावर पोहोचलो तरी पाय जमिनीवर ठेवले पाहिजे हे कुणाकडून शिकावे तर ते रफ़ी साहेबांकडूनच..
या कार्यक्रमात अयुधा बिरारी यांनी सादर केलेल्या “अच्छा जी मैं हारी चलो” या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.