उद्योगविश्वातील बदलांनुसार मनुष्यबळ व्यवस्थापनात बदल करण्यासाठी व्यावसायिकांनी सज्ज राहावे – प्रेम सिंग यांचे प्रतिपादन

Admin

HR प्रेम सिंग

जागतिक आणि देश पातळीवर उद्योग विश्वात झपाट्याने बदल घडत असताना या बदलांशी अनुरूप बदल मनुष्यबळ व्यवस्थापनात घडवून आणण्यासाठी मनुष्यबळ विकास व्यवस्थापकांनी सज्ज राहिले पाहिजे असे प्रतिपादन नॅशनल एचआरडी नेटवर्क संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री प्रेम सिंग म्हणाले या मनुष्यबळ व्यवस्थापन व्यावसायिकांच्या संस्थेच्या आठव्या राष्ट्रीय अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते

अनुभूती या सूत्रावर आधारित या अधिवेशनात २०० हून अधिक मनुष्यबळ व्यवस्थापन व्यावसायिक सहभागी झाले. संस्थेच्या पुणे शाखेला या राष्ट्रीय अधिवेशनाचे यजमानपद सलग चवथ्या वेळी मिळाले.

व्यवस्थापनशास्त्र या विषयातील अध्यापक तसेच अध्ययन आणि विकास या व्यवसायातील सल्लागार हेही या अधिवेशनात सहभागी झाले होते. संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री प्रेम सिंग, पश्चिम विभाग अध्यक्ष उषा सिंग तसेच पुणे शाखा अध्यक्ष अमन राजाबली यांनी या अधिवेशनाच्या निमित्ताने पत्रकारांशी संवाद साधला.

संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री प्रेम सिंग म्हणाले, सेवा आणि औद्योगिक क्षेत्रातील कर्मचा-यांना कालानुरूप प्रशिक्षण मिळावे यासाठी नॅशनल एचआरडी नेटवर्क व्यवस्थापनशास्त्र या विषयातील अध्यापक आणि संशोधकांचेही सहकारी घेते. मात्र कर्मचा-यांना यासाठी कोणती कौशल्ये आत्मसात करावी लागतील याचा शोध घेणे ही जबाबदारी मनुष्यबळ व्यवस्थापन व्यावसायिकांचीही आहे. यासाठी मनुष्यबळ व्यवस्थापन व्यावसायिकांना ते काम करत असलेल्या उद्योगांविषयी अधिकाधिक माहिती घेणे जरुरीचे आहे आणि या दिशेने प्रयत्न होत आहेत.

अनुभूति या चर्चासत्र मालिकेत सद्यस्थितीशी सुसंगत असे अनुभव मनुष्यबळ व्यवस्थापन व्यावसायिकांना घेता यावे असा प्रयत्न असतो, असेही श्री सिंग म्हणाले. “कृत्रिम बुद्धिमत्ता, यंत्रांची अध्ययन क्षमता (मशीन लर्निंग) यामुळे रोजगार कमी होतील ही भीती बाळगण्याचे कारण नाही. या दोन प्रवाहांमुळे रोजगारांचे स्वरूप जरूर बदलेल परंतु त्यातून नव्या संधीही तयार होतील,” असे त्यांनी सांगितले.

एनएचआरडीएनच्‍या प्रादेशिक अध्‍यक्ष (पश्चिम) श्रीमती उषा सिंग यांनी संगितले की मनुष्यबळ व्यवस्थापनापुढील आव्हाने झपाट्याने बदलत आणि विस्तारत आहेत. विशेषतः कोव्हिड लाटेच्या नंतर घरी राहून काम करण्याकडे कर्मचा-यांचा आणि उद्योगांचाही कल वाढत आहे. अशा बदलांचा कार्यक्षमता आणि उत्पादकता या पातळ्यांवर काय परिणाम होईल याचा अभ्यास होत आहे.

उद्योग तसेच सेवा क्षेत्रात कार्यपद्धती झपाट्याने बदलत आहेत आणि या बदलांशी सुसंगत अशी कौशल्ये कर्मचारी वर्गाला आत्मसात करता यावीत यासाठी त्यांना योग्य शिक्षण – प्रशिक्षण देण्याची जबाबदारी मनुष्यबळ व्यवस्थापन व्यावसायिकांवर आली आहे.

नॅशनल एचआरडीएन पुणे चॅप्टर चे अध्यक्ष अमन राजाबली म्हणाले की मनुष्यबळातील वैविध्य हे एक मोठे आव्हान मनुष्यबळ व्यवस्थापन व्यावसायिकांपुढे आहे. यामध्ये फक्त महिला – पुरुष असे वैविध्य नसून भारताच्या विविध भागातील मनुष्यबळ मुख्य प्रवाहात समाविष्ट करणे ही बाजूही पुढे आली आहे. तरुण कर्मचा-यांच्या आकांक्षा समजून घेऊन मनुष्यबळ व्यवस्थापन धोरणे आणि नियमावली आखण्याची आवश्यकता आहे,

Leave a Comment