सिंहगड रोडवर कल्पतरू ग्रुपच्या ‘कल्पतरू ब्लॉसम्स’ प्रकल्पाचे दिमाखदार उद्घाटन

Admin

कल्पतरू ब्लॉसम्स

गेल्या पाच दशकांहून अधिक काळ कल्पतरू ग्रुपने संपूर्ण भारतात अनेक ग्राहकांच्या विविध पिढ्यांना उत्कृष्ट घरे आणि व्यावसायिक जागा देऊन आनंदित केले आहे. मुंबईतील पहिली गगनचुंबी इमारत ते पुण्यातील अनेक लँडमार्क प्रोजेक्ट्स, या सर्वांनीच आधुनिक जीवनशैलीचे मापदंड उंचावले आहेत आणि जणू एक प्रकारे भारताच्या शहरी लँडस्केपचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे.

पुण्यातील बाणेर, औंध, वाकड, कल्याणी नगर अशा उच्चभ्रू परिसरांमध्ये कल्पतरूने बांधलेल्या उत्तमोत्तम प्रोजेक्ट्सनंतर सिंहगड रोडवर कल्पतरू घेऊन येत आहे त्यांचा पुढील उत्कृष्ट गृहप्रकल्प – ‘कल्पतरू ब्लॉसम्स!

नुकताच या गृह प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा दिमाखात पार पडला. या  सोहळ्यास अनेक मान्यवर उपस्थित होते. भूमिपूजन सोहळ्याबरोबरच  सेल्स ऑफिस आणि शो फ्लॅटचे उद्घाटनही करण्यात आले. या प्रकल्पाला लोकांचा उदंड प्रतिसाद लाभत असून मान्यवरांकडून ही  या प्रकल्पाचे भरपूर कौतुक होत आहे. 

सेल्स ऑफिस आणि शो फ्लॅटचे उद्घाटन श्री. राजस आर.दोशी, चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर, द इंडियन ह्युम पाईप कंपनी आणि श्री. जयंत ओसवाल, बिझिनेस हेड – पुणे रीजन, कल्पतरू लिमिटेड यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रकल्पाचे भूमिपूजन श्री. मयूर आर. दोशी, वाइस चेअरमन अँड जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर, द इंडियन ह्यूम पाईप कंपनी लिमिटेड यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी श्री. जयंत ओसवाल, बिझिनेस हेड – पुणे रीजन, कल्पतरू लिमिटेड, कल्पतरू कंपनीचे कर्मचारी आणि कल्पतरू ब्लॉसम्समध्ये बुकिंग केलेले अनेक ग्राहक यावेळी उपस्थित होते. त्यापैकी श्रीमती तृप्ती धीरज शाह, श्री. राजू कोकणे, श्री. संजय वाखरे यांच्या परिवारासह उपस्थित होते. 

या प्रकल्पात G+17, G+18 मजल्यांचे तीन टॉवर्स असून, यामध्ये प्रशस्त अशी 2, 3, 3.5, 4 आणि 4.5 बीएचके घरे उपलब्ध आहेत. या प्रकल्पाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे कल्पतरूची डिझाइन थिंकिंग ही आधुनिक विचारसरणी. या विचारसरणीमुळे या प्रकल्पातील प्रत्येक रूम अधिकच प्रशस्त झाली असून, बेडरूममध्ये वॉक-इन वॉर्डरोब आणि पुरेशी स्टोरेज स्पेसही मिळते.

2 आणि 3 बीएचके घरांमध्ये प्रशस्त लिव्हिंग आणि डायनिंग एरिया, मोठ्या बाल्कन्या, ब्रेकफास्ट काउंटर आणि सुनियोजित उपयोगाच्या जागांसह अद्ययावत स्वयंपाकघर उपलब्ध आहे.

अद्वितीय अनुभवासाठी 4 आणि 4.5 बीएचके असलेला विशेष टॉवरही येथे आहे. यामधील घरे आकाराने भव्य असून, तुमच्या प्रायव्हसीला लक्षात ठेवून बांधण्यात आली आहेत. 4.5 बीएचके घरांमध्ये स्टडी रूम आणि पावडर टॉयलेट बनवण्यात आले आहे, तसेच घरकाम करणाऱ्यांसाठी स्वतंत्र रूमही देण्यात आली आहे.

कल्पतरूचे डिझाइन थिंकिंग तत्त्वज्ञान निसर्गाशी सुसंगत आहे. येथील लँडस्केप अशा प्रकारे तयार केला आहे, ज्यामुळे घर आणि घराबाहेरील परिसर सहजपणे जोडले जातात. प्रशस्त मोकळ्या जागा, जीवनशैली उंचावणाऱ्या आणि विचारपूर्वक तयार करण्यात आलेल्या विविध सुविधाही येथे उपभोगता येतील. इथल्या विविध भागांतील लँडस्केपची रचना अशी करण्यात आली आहे की येथे भरपूर हिरवळ पाहायला मिळते. हे झोन्स पेडिस्ट्रियन फ्रेंडली असल्याने लहान मुलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीही पूर्णपणे सुरक्षित आहेत.

फिटनेसची आवड असणाऱ्यांसाठी अत्याधुनिक जिम, मल्टिपर्पज कोर्ट आणि योगसाधनेसाठी शांत, स्वतंत्र परिसर आहे. लहान मुलांसाठी खास खेळण्याची जागा आणि विशेष पाळणाघरही आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी मंदिराभोवती देण्यात आलेला विशेष परिसर तसेच अ‍ॅक्युप्रेशर पाथवेही उपलब्ध आहे.

येथील स्पा, सलून, आणि जकुझी तुमची विश्रांतीची गरज पूर्ण करतील, त्यामुळे दिवसभराचा ताण आणि थकवा दूर होऊन तुम्ही ताजेतवाने व्हाल. इथल्या को-वर्किंग स्पेस मध्ये नवनवीन कल्पना सुचतील. प्रतिष्ठित क्लबहाऊस, अ‍ॅम्फीथिएटर आणि इनडोअर प्रीव्ह्यू थिएटर यामुळे लोक एकमेकांच्या जवळ येऊन त्यांच्यातील आपुलकी आणि बांधिलकी वाढेल.

हा लँडमार्क रेसिडेन्शिअल प्रोजेक्ट मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे पुण्यातील महत्त्वाच्या भागांशी सहज जोडला जातो. या प्रोजेक्टपासून मुंबई-बेंगळुरू महामार्ग फक्त 0.7 किलोमीटर अंतरावर आहे, राजाराम ब्रिज केवळ 3 किलोमीटर अंतरावर आहे, आणि लवकरच सुरू होणाऱ्या सिंहगड रोड फ्लायओव्हरमुळे येथे सहज पोहोचता येईल. इथून फक्त 0.5 किमी अंतरावर असलेल्या आगामी माणिकबाग मेट्रो स्टेशनमुळे या प्रकल्पाला उत्कृष्ट अर्बन कनेक्टिव्हिटीही लाभली आहे.

इतिहासातील अनेक गोष्टींचा साक्षीदार असणारा सिंहगड रोड आता भविष्यात ‘कल्पतरू ब्लॉसम्स’ मधील अनेक आनंदी क्षणांचाही साक्षीदार असणार आहे.

Leave a Comment