· वार्षिक ३४२ टक्के वाढीसह महसूल ११.५ अब्ज रुपयांवर; वार्षिक ६० टक्के वाढीसह वसुली २१.३ अब्ज रुपयांवर
· आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीत वार्षिक २१७ टक्के वाढीसह पूर्व-विक्री ५९.० अब्ज रुपयांवर आणि दुसऱ्या तिमाहीत वार्षिक १८४ टक्के २७.८ वाढीसह अब्ज रुपयांवर
· आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीत वार्षिक ६० टक्के वाढीसह वसुली २१.३ अब्ज रुपयांवर आणि दुसऱ्या तिमाहीत वार्षिक २८ टक्के वाढीसह ९.२ अब्ज रुपयांवर
· आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीत वार्षिक ३४२ टक्के वाढीसह महसूल ११.५ अब्ज रुपयांवर आणि दुसऱ्या तिमाहीत वार्षिक ६५० टक्के वाढीसह ७.५ अब्ज रुपयांवर
भारतातील अग्रगण्य रिअल इस्टेट विकास कंपन्यांपैकी एक असलेल्या सिग्नेचर ग्लोबलने आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीत वार्षिक २१७ टक्के वाढीसह ५९.० अब्ज रुपयांच्या पूर्व-विक्रीची नोंद केली तर दुसऱ्या तिमाहीत वार्षिक १८४ टक्के वाढीसह २७.८ अब्ज रुपयांच्या पूर्व-विक्रीची नोंद केली.
या समूहाच्या टायटॅनियम एसपीआर या ३० अब्ज रुपयांच्या गृहप्रकल्पाच्या यशस्वी लाँचमुळे तसेच २३ अब्ज रुपयांच्या डॅक्सिन व्हिस्टासोन सोहना या टाऊनशिप प्रकल्पामुळे आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीत दमदार पूर्व-विक्रीला चालना मिळाली आहे.
कंपनीची वसुली आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीत ६० टक्के ने वाढून २१.३ अब्ज रुपयांवर पोचली आहे. पूर्व-विक्रीमधील या मोठ्या वाढीसोबत कंपनीने आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीत महसुलामध्ये वार्षिक ३४२ टक्के ने वाढ होऊन तो ११.५ अब्ज रुपयांवर पोचला आहे.
अधिकाधिक प्रकल्पांच्या पूर्ततेमुळे त्याचे प्रतिबिंब पी अँड एल खात्यात (नफा-तोटा ताळेबंदात) पडले आहे आणि त्यामुळे वित्तीय ताळेबंदाला आणखी मजबूती येण्याची अपेक्षा आहे.
आर्थिक वर्ष २०२४ च्या अखेरीस ११.६ अब्ज रुपयांवर असलेले निव्वळ कर्ज आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीत १०.१ अब्ज रुपयांवर पोचले आहे.
कंपनीच्या कामगिरीबद्दल बोलताना चेअरमन श्री. प्रदीपकुमार अगरवाल म्हणाले, दिल्ली-एनसीआर प्रदेशातील, विशेषतः गुरुग्राममध्ये, रिअल इस्टेट बाजारपेठेत ठोस मूलभूत तत्त्वे दिसून येत आहेत.
त्याला ग्राहकांची चिवट मागणी, बाजारपेठेतील सकारात्मक वातावरण आणि लक्षणीय मूलभूत सोईसुविधांची वाढ यांचा आधार मिळत आहे. गुरुग्राममध्ये आमच्या अलीकडील लॉन्चला मिळालेल्या जोरदार प्रतिसादामुळे विचारपूर्वक नियोजन केलेल्या समुदायांमधील दर्जेदार घरांची वाढती मागणी अधोरेखित होते.
भविष्यात आम्ही कामकाजाची कार्यक्षमता वाढवण्यावर, आमचा आर्थिक पाया मजबूत करण्यावर आणि सर्व भागधारकांसाठी शाश्वत मूल्य प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत.
गुरुग्रामच्या विस्तारित पायाभूत सुविधा आणि एनसीआरमध्ये सुरू असलेले शहरीकरण यांमुळे, आम्ही शिस्तबद्ध आर्थिक दृष्टीकोन राखून प्रस्थापित विकासकांसाठी वाढत असलेल्या गृहनिर्माण गरजा पूर्ण करण्यासाठी आशादायक संधींची आम्हाला अपेक्षा आहे.