न्‍यू एरा: स्‍कोडा ऑटो इंडियाकडून नवीन कायलॅकचे अनावरण

Admin

Škoda Auto स्‍कोडा ऑटो

कंपनीच्‍या पहिल्‍या सब ४-मीटर एसयूव्‍हीचे जानेवारी २०२५ मधील लाँचपूर्वी जागतिक अनावरण 

7,89,000 रूपयां प्रारंभिक किमतीच्‍या घोषणा   

  • आरामदायी आणि एैसपैस जागा: सर्वोत्तम ड्रायव्हिंग गतीशीलता आणि एैसपैस इंटीरिअरसह ४४६ लिटरची सेगमेंट-लीडिंग बूट-स्‍पेस 
  • सर्वसमावेशक सेफ्टी सिस्‍टम्‍स: प्रमाणित म्‍हणून अॅक्टिव्‍ह व पॅसिव्‍ह सुरक्षितता वैशिष्‍ट्यांची व्‍यापक श्रेणी, तसेच सहा एअरबॅग्‍ज 
  • आधुनिक प्रबळता: नवीन कायलॅकमध्‍ये स्‍कोडाच्‍या नवीन डिझाइन शैलीचे घटक असण्‍यासोबत प्रबळ लुक आहे
  • प्रमाणित पॉवरट्रेन: शक्तिशाली, पण कार्यक्षम १.० टीएसआय इंजिन ८५ केडब्‍ल्‍यू शक्‍ती आणि १७८ एनएम टॉर्क देते, ज्‍यासोबत सिक्‍स-स्‍पीड मॅन्‍युअल किंवा ऑटोमॅटिक ट्रान्‍समिशन आहे
  • स्‍पर्धात्‍मक किंमत: कायलॅकची किंमत 7,89,000 रूपयां रूपयांपासून सुरू होते, ग्राहक आजपासून https://www.skoda-auto.co.in/models/teaser/kylaq येथे आणि भारतभरातील डिलरशिप्‍समध्‍ये बुकिंगसाठी नोंदणी करू शकतात

मुंबई, नोव्‍हेंबर ६, २०२४ – स्‍कोडा ऑटो इंडियाने पहिल्‍यांदाच भारत व जगासाठी बहुप्रतिक्षित एसयूव्‍ही कायलॅकचे अनावरण केले आहे. कायलॅक भारतात स्‍कोडा ऑटोसाठी न्‍यू एराची सुरूवात करत आहे, जेथे ब्रँड नवीन बाजारपेठांमध्‍ये प्रवेश करण्‍यासोबत नवीन ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. कंपनीने यंदा फेब्रुवारीमध्‍ये या एसयूव्‍हीच्‍या घोषणेसह भारतात अधिक विस्‍तार करण्‍याच्‍या आपल्‍या महत्त्वाकांक्षांना अधिक दृढ केले. यंदा ऑक्‍टोबरमध्‍ये स्‍कोडा ऑटो इंडियाने कायलॅकच्‍या कमॉफ्लेज प्री-प्रॉडक्‍शन व्‍हर्जनच्‍या ड्रायव्हिंग चाचण्‍या केल्‍या. एक महिन्‍यानंतर कायलॅकचे वर्ल्‍ड प्रीमियर करण्‍यात आले आहे, तसेच बुकिंग्‍जना २ डिसेंबर २०२४ पासून सुरूवात होईल.   

स्‍कोडा ऑटो

स्‍कोडा ऑटोचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी क्‍लॉस झेलमर म्‍हणाले, ”स्‍कोडा कायलॅक आमची पहिली सब-४-मीटर एसयूव्‍ही आहे, जी आमच्‍या ब्रँडसाठी नवीन एण्‍ट्री पॉइण्‍ट म्‍हणून भारतात आणि भारतीयांसाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. भारत आमच्‍या आंतरराष्‍ट्रीयीकरण योजनांसाठी प्रमुख असण्‍यासोबत जगातील तिसरी सर्वात मोठी कार बाजारपेठ आहे आणि एसयूव्‍हींचे नवीन वेईकल विक्रीमध्‍ये जवळपास ५० टक्‍के योगदान आहे.

या लोकप्रिय व झपाट्याने विकसित होणाऱ्या विभागामध्‍ये सर्वोत्तम एसयूव्‍हींचा शोध घेत असलेल्‍या नवीन ग्राहकांनी कायलॅकचे मनापासून स्‍वागत करावे, अशी आमची इच्‍छा आहे. आकर्षकतेमध्‍ये अधिक भर करत कायलॅक भारतात नवीन व्हिज्‍युअल आकर्षकतेसह आमच्‍या मॉडर्न सॉलिड डिझाइन शैलीचे पदार्पण करत आहे. या वेईकलमध्‍ये व्‍हेरिएण्टस्, रंग, वैशिष्‍ट्यांची व्‍यापक निवड आणि २५ हून अधिक अॅक्टिव्‍ह व पॅसिव्‍ह सुरक्षितता तंत्रज्ञानांचे प्रमाणित पॅकेज आहे. 7,89,000 रूपयांच्‍या स्‍पर्धात्‍मक सुरूवातीच्‍या किमतीसह कायलॅक भारतातील सर्वात उपलब्‍धहोण्‍याजोगे स्‍कोडा मॉडेल आहे.” 

कायलॅक 

भारतीयांनी स्‍कोडा कायलॅकचे नामकरण केले आहे. हे नाव क्रिस्‍टलसाठी (स्‍फटिक) संस्‍कृत शब्‍दामधून घेण्‍यात आले असून कैलास पर्वताच्‍या नावावरून ठेवण्‍यात आले आहे. स्‍कोडा ऑटो इंडियाच्‍या एसयूव्‍ही लाइन अपमधील मोठ्या कुशकचे देखील सम्राटसाठी संस्‍कृत शब्‍दावरून नाव ठेवण्यात आले आहे. कायलॅक कंपनीच्‍या कोडियक, मोठी ४x४ आणि मध्‍यम आकाराची कुशक अशा एसयूव्‍हींच्‍या रोस्‍टरमध्‍ये अधिक भर करते.

कायलॅकमध्‍ये काही सेगमेंट-फर्स्‍टस् वैशिष्‍ट्ये आहेत, जसे सिक्‍स-वे इलेक्ट्रिक सीट्ससह ड्रायव्‍हर व पुढील प्रवासीसाठी व्‍हेण्टिलेशन. कायलॅकमधील बूट स्‍पेस तिच्‍या विभागातील सर्वोत्तम आहे, जे ४४६ लिटर आहे. कारमध्‍ये ऑटो क्‍लायमेट्रॉनिकसह इलेक्ट्रिकली अॅडजस्‍टेबल फ्रण्‍ट सीट्ससाठी व्‍हेण्टिलेशन देखील आहे. निवडक व्‍हेरिएण्‍ट्स इलेक्ट्रिक सनरूफसह देखील उपलब्‍ध आहेत.  

स्‍कोडा ऑटो फोक्‍सवॅगन इंडियाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी पियुष अरोरा म्‍हणाले, ”स्‍कोडा कायलॅकच्‍या वर्ल्‍ड प्रीमियरसह हा आमच्‍या भारतातील प्रवासामधील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्‍पा आहे. कायलॅकने २०२४ मध्‍ये मोठा उत्‍साह व चर्चा निर्माण केली आहे. आणि मला भारतासह जगासाठी स्‍कोडा कायलॅकचे अनावरण करण्‍याचा अत्‍यंत अभिमान वाटत आहे. उच्‍च दर्जाचे स्‍थानिकीकरण, अद्वितीय ड्रायव्हिंग गतीशीलता आणि तडजोड न करणारी सुरक्षितता अशा सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांसह कायलॅक बाजारपेठेत मोठा प्रभाव निर्माण करेल.”  

स्‍कोडा ऑटो

स्‍कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड संचालक पीटर जनेबा म्‍हणाले, ”कायलॅकने निश्चितच उत्तम कामगिरी केली आहे आणि पुढील काही वर्षांमध्‍ये भारतातील आमच्‍या विकासाला गती देईल. आमच्‍यासाठी भारतात ही न्‍यू एराची सुरूवात आहे. आम्‍हाला माहित आहे की, आम्‍ही भारतातील सर्वात स्‍पर्धात्‍मक विभागामध्‍ये प्रवेश करत आहोत. आणि आम्‍हाला विश्‍वास आहे की कायलॅक आपल्‍या सुरक्षितता व ड्रायव्हिंग गतीशीलतेसह मोठा प्रभाव घडवून आणेल.

तसेच, कायलॅकमध्‍ये काही सेगमेंट-लीडिंग वैशिष्‍ट्ये आहेत, जसे सिक्‍स-वे फ्रण्‍ट इलेक्ट्रिक सीट अॅडजस्‍टमेंटसह सीट व्‍हेण्टिलेशन आणि दर्जात्‍मक ४४६ लिटर बूट स्‍पेस. कायलॅकने कुशक व स्‍लाव्हियानंतर आमच्‍या भारत-केंद्रित उत्‍पादन लाइन-अपला पुढे नेणे सुरू ठेवले आहे आणि नवीन बाजारपेठांमध्‍ये प्रवेश करण्‍याच्‍या, तसेच स्‍कोडा कुटुंबामध्‍ये नवीन ग्राहकांना सामील करण्‍याच्‍या आमच्‍या ध्‍येयाला अधिक दृढ करेल. आमचा विश्‍वास आहे की, आम्‍ही कायलॅकची किंमत परवडणारी असण्‍याच्‍या आमच्‍या कटिबद्धतेचे पालन केले आहे आणि ही वेईकल भारतात युरोपियन तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करण्‍याची खात्री घेण्‍याप्रती उत्‍सुक आहोत. ही कॉम्‍पॅक्‍ट, पण अद्वितीय कार आहे. आणि याच कारणामुळे आम्‍ही अभूतपूर्व मोशन पिक्‍चर प्रीमियरच्‍या माध्‍यमातून या कारचे अनावरण केले आहे.” 

शक्‍तीसह कार्यक्षमता व सुरक्षितता 

कायलॅक मॅन्‍युअल ट्रान्‍समिशनसह १०.५ सेकंदांमध्‍ये १०० किमी/तास गती प्राप्‍त करू शकते. या एसयूव्‍हीची अव्‍वल गती १८८ किमी/तास आहे. या कारमधील १.० टीएसआय इंजिन ८५ केडब्‍ल्‍यू शक्‍ती आणि १७८ एनएम टॉर्कची निर्मिती करते. हे पॉवरप्‍लांट (इंजिन) सिक्‍स-स्‍पीड मॅन्‍युअल किंवा सिक्‍स-स्‍पीड टॉर्क कन्‍व्‍हर्टर ऑटोमॅटिकसह निवडक व्हेरिएण्‍ट्समध्‍ये पॅडल शिफ्टर्ससाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. ही कार कुशक व स्‍लाव्हियाप्रमाणे एमक्‍यूबी-एओ-इन व्‍यासपीठावर आधारित आहे. 

Leave a Comment