- भारतातील स्वदेशी शिपमेंटवर सुद्धा 40% पर्यंत सूट लागू होणार आहे
- ग्राहकांना गोग्रीन प्लस सेवेचा लाभ उचलण्याचा पर्याय देण्यात येणार आहे जेणेकरून महोत्सवांचा आनंद पसरवताना वितरण अधिक शाश्वत पद्धतीने केले जात आहे याची खात्री करता येईल.
- ही ऑफर दिनांक 2 नोव्हेंबर 2024 पर्यंत वैध आहे
डी.एच.एल एक्स्प्रेस ही आंतरराष्ट्रीय एक्स्प्रेस सेवेतील जागतिक आघाडीची कंपनी आहे आणि तिने ग्राहकांना आंतरराष्ट्रीय व स्वदेशी आउटबाऊंड शिपमेंटवर सूट देऊ केल्या आहेत. असे करून ती दिवाळसणी ग्राहकांच्या आनंदात भर घालत आहे. ही ऑफर दिनांक 02 नोव्हेंबर 2024 पर्यंत मर्यादित काळापूर्ती वैध असेल.
या ऑफरमुळे ग्राहकांना आंतरराष्ट्रीय शिपमेंटवर 50% पर्यंत आणि स्वदेशी शिपमेंटवर 40% पर्यंत सूटचा आनंद उचलता येणार असून जगभरात असलेल्या त्यांच्या प्रियजनांना त्यांना सणासुदीच्या शुभेच्छा आणि भेटवस्तू पाठविता येणार आहेत. ज्या ग्राहकांना इन-स्टोअर ऑफरचा लाभ उचलायचा आहे, त्यांना शिपमेंट बुक करताना फक्त ‘दिवाळी50’ प्रोमो कोड वापरावयाचा आहे.
दिवाळी, म्हणजेच प्रकाशाचा उत्सव, भारतातील सर्वात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि त्या दिवसांमध्ये कुटुंबिये एकत्र येऊन मिठाई आणि भेटवस्तू एकमेकांना देत असतात. या दिवसांमध्ये एकत्र येण्याचे महत्त्व डी.एच.एल एक्सप्रेस जाणते. अनेक मैल दूर असून सुद्धा प्रियजनांना एकत्र आणण्याचे उद्दीष्ट डी.एच.एल एक्स्प्रेस ने ठेवलेले असून ग्राहकांना विश्वसनीय व किफायतशीर शिपिंग उपाय प्रदान करून हे उद्दिष्ट साध्य केले जाणार आहे.
ग्राहकांना 3 किलो ते 25 किलो वजनाच्या आंतरराष्ट्रीय शिपमेंटवर 50% पर्यंत सूट मिळेल; तर 2 किलो ते 10 किलो वजनाच्या स्वदेशी शिपमेंटवर 40% सूट मिळेल. ही ऑफर भारतभरातील 650 हून अधिक डी.एच.एल एक्स्प्रेस सेवा केंद्रांवर (सर्व्हिस पॉइंट्सवर) उपलब्ध असेल.
उल्लेखनीय असे आहे की, ग्राहकांना पर्यावरणास अनुकूल शिपिंग पर्याय निवडता येईल. डी.एच.एल ची गोग्रीन प्लस सेवा बुक-अँड-क्लेम पद्धतीचा वापर करते आणि तिच्या माध्यमातून खरेदीदार खरेदीच्या वेळी विशिष्ट प्रमाणात शाश्वत विमान इंधन ‘बुक’ करतो आणि नंतर त्यांच्या शाश्वततेच्या उद्दिष्टांकडे हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्याचा ‘दावा’ करतो.
शाश्वत विमान इंधन डी.एच.एल च्या ग्राहकांसाठी स्कोप 3 हरितगृह वायू उत्सर्जन कमी करते. कंपनीने जागतिक लॉजिस्टिक्स नेटवर्कमध्ये हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्याचे व्यापक ध्येय ठेवलेले असून हा उपक्रम या ध्येयाशी सुसंगत आहे.
संदीप जुनेजा, उपाध्यक्ष – सेल्स अँड मार्केटिंग, डी.एच.एल एक्सप्रेस इंडिया म्हणाले की, “दिवाळी म्हणजे उत्सव साजरा करण्याचे व एकमेकांकांना भेटण्याचे दिवस असतात आणि स्पर्धात्मक दर उपलब्ध करून देऊन मूल्य प्रदान करताना आमच्या ग्राहकांना त्यांच्या प्रियजनांच्या जवळ आणणारी ऑफर सादर करण्याचा आम्हाला अभिमान आहे.
खास करून सणासुदीच्या दिवसांमध्ये वेळेवर व कार्यक्षम वितरण सर्वात महत्त्वाचे असते आणि डी.एच.एल मध्ये, आम्ही सुलभ, विश्वसनीय लॉजिस्टिक्सचे महत्त्व समजतो. आम्ही उत्कृष्ट लॉजिस्टिक्स उपाय प्रदान करण्याची बांधिलकी स्वीकारलेली आहे ज्यामुळे संबंध (कनेक्शन) कायम राखले जातील याची खात्री केली जाते.
याव्यतिरिक्त, गोग्रीन प्लस सारख्या उपक्रमांद्वारे शाश्वततेवर आमचे सतत लक्ष असणे अभिनव उपाय प्रदान करण्यासाठी आमचे समर्पण अधोरेखित करते ज्यामुळे ग्राहकांना गुणवत्ता किंवा कार्यक्षमतेशी तडजोड न करता त्यांचे कार्बन फूटप्रिंट कमी करता येतात.
डी.एच.एलचे व्यापक जागतिक नेटवर्क 220 पेक्षा जास्त देश आणि प्रदेशांमध्ये पसरलेले आहे. याचा वापर करून ग्राहकांना आपली दिवाळीची भेट वस्तू सहज पाठविता येणार आहे. या ऑफर मध्ये सक्रिय एस.एम.एस आणि ईमेल अपडेट्स मिळतात ज्यामुळे संपूर्ण शिपमेंट पाहता येण्याची सुनिश्चित होते आणि त्यायोगे जगभरात सुरळीत व त्रासमुक्त वितरण होण्याची खात्री होते.
या ऑफरबद्दल चौकशी करायची असल्यास, ग्राहकांनी 1800 11 1345 या टोल फ्री क्रमांकावर डी.एच.एल एक्सप्रेसशी संपर्क करावा किंवा https://mydhl.express.dhl/in/en/home.html#/createNewShipmentTab येथे डी.एच.एल वेबसाइटला भेट देऊन कोटेशन मिळवावे आणि ऑनलाइन शिपमेंट बुक करावी.