इंडियन स्ट्रोक असोसिएशन (ISA) द्वारे वाराणसी येथे नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या आणि स्ट्रोककेंद्रित असलेल्या ‘मिशन ब्रेन अटॅक’ या देशव्यापी मोहिमेला पुण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आजाराच्या प्रतिबंधापासून ही चर्चा सुरू झाली ती थेट आजार झाल्यास त्याचे व्यवस्थापन आणि पुनर्वसनापर्यंत पोहोचली. जागतिक आकडेवारीनुसार, प्रत्येक चार व्यक्तींपैकी एकाला स्ट्रोकचा त्रास होऊ शकतो.
पत्रकार परिषदेला संबोधित करताना, डॉ. निर्मल सूर्या, अध्यक्ष, ISA, म्हणाले, “स्ट्रोकची तीन प्रमुख कारणे आहेत- रक्तदाब, साखर आणि कोलेस्ट्रॉल.
जर तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांना पक्षाघाताचा झटका आला असेल आणि तुम्हाला देखील रक्तदाब, साखर आणि कोलेस्ट्रॉल असेल तर तुम्ही सावध राहण्याची गरज आहे. अशा वेळी आपले वजन कमी ठेवणे, कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवणे तसेच मद्य आणि तंबाखू सोडणे योग्य ठरते.”
ते पुढे म्हणाले, “सध्याच्या आकडेवारीनुसार दर मिनिटाला सरासरी तीन व्यक्ती अर्धांगवायूने ग्रस्त आहेत. अर्धांगवायू हे देखील मृत्यूचे तिसरे सर्वात मोठे कारण आहे.”
डॉ. अरविंद शर्मा, सचिव, ISA, म्हणाले, “मिशन ब्रेन अटॅक ही संपूर्ण भारतभर राबवली जाणारी अशा प्रकारची एकमेव मोहीम आहे जी स्ट्रोक प्रतिबंध, जागरूकता, व्यवस्थापन, काळजी आणि पुनर्वसन या सर्व गोष्टींचा विचार करते. पुण्यात झालेल्या या कार्यक्रमाला पुणेकरांनी मोठ्या उत्साहात स्वीकारले.”
‘मिशन ब्रेन अटॅक’ चे उद्दिष्ट ब्रेन स्ट्रोकबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि प्राथमिक प्रतिबंध म्हणजे जोखीम घटकांवर नियंत्रण ठेवणे, थ्रॉम्बोलायसीससह तीव्र उपचार आणि गोल्डन अवरमध्ये यांत्रिक थ्रोम्बेक्टॉमी या तीन आघाड्यांवर संपूर्ण काळजी घेणे हे आहे. यासोबतच अपंगांसाठी दीर्घकालीन पुनर्वसनाची सोय करणे.
कार्यक्रमातील प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे
गोल्डन अवर
या आजारात स्ट्रोकनंतरचे 4 तास 30 मिनिटे, हा गोल्डन अवर म्हणून ओळखले जातात. यात स्ट्रोकचे परिणाम टाळण्यासाठी रुग्णाला रुग्णालयात नेणे योग्य ठरते.
आनुवंशिकता
एखाद्या व्यक्तीला स्ट्रोक येण्याशी आनुवंशिकतेचा थेट संबंध नसला तरी, कौटुंबिक वैद्यकीय पार्श्वभूमीची त्यात महत्त्वाची भूमिका असेल
लक्षणे
स्ट्रोकची सगळी लक्षणे तातडीने ओळखणे आणि रुग्णाला तातडीने रुग्णालयात नेणे हे अत्यंत गरजेचे आहे. तसेच यासंदर्भात जनजागृती करणे/असणे हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे.
काही लक्षणे पुढीलप्रमाणे:
B – बॅलन्स
E – दृष्टी दोष
F – चेहऱ्यात बिघाड
A – हाता – पायांचा कमकुवतपणा
S – बोलण्यात अडथळे
T – 108 किंवा रुग्णवाहिकेला फोन करून स्ट्रोकशी संबंधित रुग्णालयात पोहोचण्याची वेळ (जिथे CT स्कॅनची सोय असेल)