आरोग्याबद्दल सजग झालेल्या नागरिकांकडून शाकाहारी पदार्थांना मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे. त्यामुळे बेकरी उद्योगालाही चांगले दिवस येत आहेत. असे या उद्योगातील जाणकारांचे म्हणणे आहे. दुसरीकडे ही मागणी पूर्ण करण्याकरता पुण्यातील मालपाणी बेकलाईटची उत्पादनांची मालिका पुढे येत आहे.
आरोग्य तसेच पोषक पदार्थांबाबत नागरिकांमध्ये जाणीव अधिकाधिक वाढत आहे. त्यानुसार शाकाहारी पदार्थांची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत असून भारतातील शाकाहारी खाद्यपदार्थ उद्योगही त्यामुळे वाढत आहे. भारतातील बेकरी उद्योग १९९० च्या दशकापर्यंत अत्यंत असंघटित होता. त्यावेळी स्थानिक बेकरींचे बाजारपेठेत वर्चस्व होते. त्यामुळे शाकाहारी व मांसाहारी उत्पादने, पौष्टिक आणि स्वच्छ उत्पादने असा स्पष्ट भेद करणे अवघड होते.
म्हणून शाकाहारी पदार्थांसोबतच मांसाहारी पदार्थ विकणाऱ्या बेकरीमध्ये जायचे लोक टाळतात यातूनच संपूर्ण शुद्ध शाकाहारी बेकरी उत्पादने असलेल्या या खाद्यपदार्थ मालिकेचा जन्म झाला. या संकल्पनेबद्दल मालपाणी बेकलाईटचे अधिकृत प्रवक्ते म्हणाले, “वैयक्तिक पॅकबंद मालाचे व्यापारीकरण करणारा बेकलाईट हा एक ब्रँड आहे. कठोर दर्जा चाचण्या करून सर्वोत्तम आरोग्यकारक स्थितीमध्ये पॅकबंद केलेली बेकरी उत्पादने त्यांनी सादर केली.
स्वच्छता आणि दर्जा यांच्याशी तडजोड न करता मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याकरता बेकलाईट हायएंड ऑटोमेशन आणि अन्य आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करते. शंभर टक्के शुद्ध शाकाहारी उत्पादने देणे हे आमचे ध्येय आहे. अत्यंत शुद्ध आणि सर्वोत्तम दर्जाचे घटक पदार्थ वापरून ते तयार केलेले असतात.
घरी केलेल्या पदार्थांसारखा आपलेपणा व अस्सलपणा त्यांच्यात असतो.” ते पुढे म्हणाले, “ चहाच्या निमित्ताने कुटुंब आणि मित्रांसोबत आपले बंध आणखी बळकट करण्यावर या ब्रँडचा विश्वास आहे.
चहापानाला आणखी रंगतदार करण्यासाठी आमच्याकडे अनेक प्रकारचे स्नॅक्स उपलब्ध आहेत. नुकतेच त्यांनी साबुदाणा चिवडा, बटाटा चिवडा, लाल मिरची बटाटा चिवडा ही चिवड्याची श्रेणी सादर केली. हे फराळाचे पदार्थ उपवासासाठी अगदी योग्य आहेत.”
खाद्यपदार्थांचा व्यवसाय २०३० पर्यंत १६२ अब्ज अमेरिकी डॉलर एवढा होईल आणि जागतिक प्रथिने बाजारपेठेत त्यांचा वाटा ७.७ टक्के असेल, असा अंदाज आहे. तसेच प्राणी आणि दुग्धजन्य प्रथिनांची बाजारपेठ २०३० पर्यंत १.२ ट्रिलियन अमेरिकी डॉलर एवढी होण्याचा अंदाज आहे. वनस्पती आधारित डेअरी बाजारपेठ वार्षिक एकत्रित २०.७ टक्के वाढीसह २ कोटी १० अमेरिकी डॉलर वरून ६ कोटी ३९ अमेरिकी डॉलर पर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे.
ग्राहक खाद्यपदार्थांच्या बाबतीत पर्यावरण आणि आरोग्याच्या परिणामांबाबत अधिकाधिक जागरूक होत आहेत. ते वनस्पती आधारित पर्यायी खाद्यपदार्थांकडे वळत आहेत. ग्राहकांच्या या ओढ्यामुळे वनस्पती आधारित खाद्यपदार्थांची वाढ होत आहे. येत्या काही वर्षांमध्ये ही वाढ अशीच कायम राहण्याची अपेक्षा आहे. जागतिक शाकाहारी खाद्यपदार्थांचा उद्योग २०२२ ते २०२७ दरम्यान वार्षिक एकत्रित ११.३२ टक्के दराने वाढण्याचा अंदाज आहे. (स्रोत : आयबीईएफ)
पर्यायी पदार्थांचा वापर
बेकरी पदार्थांमध्ये चरबीयुक्त घटकांचा वापर करण्यात येतो. त्यांच्याऐवजी वापरण्यात येणाऱ्या घटकांच्या समस्येमुळे शुद्ध शाकाहारी उत्पादने विकणाऱ्या बेकरी संख्येने कमी आहेत. मात्र शाकाहारी बेकरी उत्पादनांची मागणी सातत्याने वाढत आहे.
आपल्या सर्व उत्पादनांमध्ये शाकाहारी उत्पादने उपलब्ध करून देऊन ही वाढती मागणी भागविण्याची जबाबदारी बेकरी उद्योगावर आहे. मग हे उत्पादने प्री-मिक्स असो अथवा खाण्यासाठी तयार असलेली असो. अंडी आणि प्राण्यांची चरबी यासारख्या मांसाहारी घटकाच्या ऐवजी पर्यायी घटक वापरून खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संशोधन करण्यात आले आहे.
या पर्यायी घटक पदार्थांमुळे मूळ घटक पदार्थांचे कार्य व्हायला पाहिजे, परंतु अंतिम बेकरी उत्पादनाच्या चव किंवा स्वरूपावर त्याचा परिणाम होता कामा नये, हे महत्त्वाचे असते. अंडी हा सर्वात महत्त्वाचा मांसाहारी घटक पदार्थ असून त्याच्या ऐवजी पर्यायी घटक पदार्थ वापरावा लागतो. मात्र अंड्याचा पांढरा आणि पिवळा दोन्ही बलक बेकिंगमध्ये अनेक प्रकारच्या भूमिका निभावतात. त्यांच्या या प्रत्येक भूमिकेसाठी वेगळा घटक पदार्थ वापरावा लागतो.