आइकिया या जगातील सर्वात विश्वसनीय होम फर्निशिंग्ज ब्रँड आणि शाश्वत व्यवसायाला समर्थन देणाऱ्या कंपनीने बेंगळुरू, हैदराबाद आणि पुणे येथे १०० टक्के ईव्ही-पॉवर्ड डिलिव्हरींसह भारतातील पहिला मोठा टप्पा गाठला.
त्यांचे मुंबईतील कार्यसंचालन लवकरच या श्रेणीमध्ये सामील होईल आणि कंपनी ईव्ही-फर्स्ट दृष्टिकोनासह नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश करेल, ज्याची सुरूवात दिल्ली एनसीआरसह होईल.
आइकिया स्थापना करण्यात आलेले शहर हैदराबादमध्ये त्याच दिवशी डिलिव्हरीसंदर्भात प्रायोगिक तत्त्वावर काम करत आहे आणि आगामी वर्षात सर्व बाजारपेठांमधील आपली उपस्थिती वाढवण्याची योजना आहे.
या महत्त्वपूर्ण टप्प्यामधून शाश्वत मूल्य साखळीप्रती आइकिया इंडियाची स्थिर कटिबद्धता दिसून येते. २०१९ मध्ये ईव्ही सोल्यूशन्सचा व्यावसायिक शोध घेण्यापासून २०२३ मध्ये २८ टक्के हरित डिलिव्हरींचे संपादन आणि आता ८८ टक्के ईव्ही अवलंबन दर संपादित करण्यापर्यंत कंपनी देशभरातील आपले कार्बन फूटप्रिंट कमी करण्याच्या दिशेने मोठे प्रयत्न करत आहे.
या प्रयत्नांच्या माध्यमातून आइकिया इंडिया पर्यावरणदृष्ट्या जबाबदार कार्यसंचालनांसाठी नवीन मानक स्थापित करत आहे, ज्यामुळे हरित भविष्यासाठी मार्ग मोकळा होत आहे. आइकिया भारतात सहयोगाने प्रबळ ईव्ही इकोसिस्टम निर्माण करत भारतातील ईव्ही परिवर्तनाचे नेतृत्व करत आहे.
ईव्ही इकोसिस्टम कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि हवामान नियंत्रणाला चालना देण्यासाठी आवश्यक आहे. आपल्या नेटवर्क परिवर्तनामध्ये वाढ करण्यासाठी आइकियाने भारतातील लघु व मध्यम-आकाराचे व्यवसाय व स्टार्टअप्ससह स्थानिक ओरिजिनल इक्विपमेंट उत्पादकांसोबत सहयोग केला आहे,
जेथे या सहयोगाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण गतीशीलता सोल्यूशन्स विकसित करण्यात येत आहेत. हे प्रयत्न प्रबळ स्थानिक अर्थव्यवस्था निर्माण करण्यास, रोजगार निर्मितीला गती देण्यास आणि जागतिक उद्योग प्रमुखांसोबत सहयोगाने प्रगती करण्यासाठी लघु व्यवसायांना सक्षम करण्यास मदत करत आहेत.
आइकिया इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व चीफ सस्टेनेबिलिटी ऑफिसर सुझेन पल्वेरर म्हणाल्या, ”आइकियासाठी शाश्वत मूल्य साखळी आमच्या विकास प्रवासाचा आवश्यक भाग आहे. त्या प्रयत्नांच्या दिशेने अनेक महत्त्वपूर्ण टप्प्यांपैकी हा पहिला टप्पा आहे आणि आम्हाला भारतातील आमच्या स्थापना वर्षापासून ईव्ही प्रवासाचे नेतृत्व करण्याचा अभिमान वाटतो. आमचा ठाम विश्वास आहे की नफा आणि प्लॅनेट सहयोगाने निर्माण करता येऊ शकतात, तसेच आम्ही या मानसिकतेसह नेतृत्व करत राहू.”
आइकिया इंडियाचे १०० टक्के इलेक्ट्रिक लास्ट-माइल डिलिव्हरीप्रती परिवर्तन शाश्वत व सुरक्षित भविष्याच्या दिशेने उल्लेखनीय पाऊल आहे. २०१९ मध्ये आइकियाने आपल्या डिलिव्हरी ताफ्यामध्ये इलेक्ट्रिक वेईकल्स सादर केल्यापासून शून्य-उत्सर्जनप्रती प्रवास सुरू झाला. सुरूवातीला, स्टोअरमध्ये तीन-चाकी टक-टक्स तैनात करण्यात आले, ज्यांनी महिन्याला हजारो ऑर्डर्स वितरित केल्या.
मोठ्या फर्निचर डिलिव्हरींच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी कंपनीने आपल्या कार्यसंचालनांमध्ये रेट्राफिट ट्रक्सचा देखील समावेश केला आणि या इलेक्ट्रिक वेईकल्सना चार्ज करण्यासाठी इन-हाऊस पायाभूत सुविधा स्थापित केल्या.
ईव्ही अवलंबतेला मोठ्या प्रमाणात गती देत आइकिया इंडियाचा सर्वांसाठी उत्पादक, सहयोगी, डिलिव्हरी ड्रायव्हर्स आणि ग्रीन एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंगसह मोठ्या इकोसिस्टमला प्रेरित करण्याचा मनसुबा आहे.
या विकासाबाबत मत व्यक्त करत आइकिया इंडियाच्या कंट्री कस्टमर फुलफिलमेंट मॅनेजर सायबा सुरी म्हणाल्या, ”आइकिया इंडियामध्ये लॉजिस्टिक्सला इलेक्ट्रिफाय करण्याप्रती आमचा दृष्टिकोन ईव्हींचा अवलंब करण्यापलीकडे आहे. आम्ही मूल्य साखळीमधील सर्वांसाठी कार्यक्षम पायाभूत सुविधा, कौशल्य निर्माण उपक्रम आणि भावी संधी निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
आम्ही ईव्ही-फर्स्ट दृष्टिकोनासह भारतात विकास करत असताना आइकिया इंडिया आता त्यासंबंधित आव्हानांचे निराकरण करण्याप्रती अधिक सुसज्ज आहे, तसेच दीर्घकालीन, नाविन्यपूर्ण सोल्यूशन्समध्ये गुंतवणूक करण्याप्रती कटिबद्ध आहे. आम्ही सहयोगींचे मन:पूर्वक आभार मानतो, जे आमच्यासह हा दृष्टिकोन शेअर करतात.
आम्ही नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश करत असताना ते या परिवर्तनासाठी सुसज्ज असण्याची खात्री घेण्याला आम्ही प्राधान्य देत आहोत, ज्यामुळे आमच्या पुरवठा साखळीच्या भविष्यासाठी सर्वोत्तम पाया रचला जाईल.”
डिकार्बनायझेशनमधील प्रमुख कंपनी आइकिया ईव्ही अवलंबन अधिक सुलभ व कार्यक्षम करण्यासाठी भारतातील मोठ्या ईव्हींसाठी चार्जिंग स्टेशन्स विस्तारित करत आहे. कंपनीने डिलिव्हरी व्हॅन्स, ग्राहक आणि सह-कर्मचाऱ्यांसाठी सर्व लार्ज-फॉर्मट स्टोअर्समध्ये ईव्ही चार्जिंग स्टेशन्स देखील स्थापित केले आहेत.
प्रगत इनबिल्ट टेलिमॅटिक्स तंत्रज्ञानाचा पाठिंबा असलेला ब्रँडचा वैविध्यपूर्ण ईव्ही ताफा ६८० किग्रॅपासून १७००० किग्रॅपर्यंत भाराची हाताळणी करतो. या सुधारणांशी एकीकृत होत आइकिया उद्योगामध्ये बेंचमार्क स्थापित करत आहे, तसेच सरकारी नियमनांनुसार ८८ टक्के ते १०० टक्के अनुपालन करत आहे.
कंपनीचा २०२५ पर्यंत आपल्या सर्व कार्यसंचालनांमध्ये १०० टक्के ईव्ही डिलिव्हरी संपादित करण्याचा मनसुबा आहे, ज्यासाठी मोठ्या स्वरूपातील ईव्ही ताफ्याला प्रगत करत आहे, सतत नाविन्यतेला चालना देत आहे आणि सरकारसोबत सहयोग करत आहे. जागतिक स्तरावर, आइकियाचा क्लायमेट पॉझिटिव्ह बनण्याचा, तसेच मूल्य साखळीमधील ग्रीनहाऊस उत्सर्जन २०३० पर्यंत निम्मे व २०५० पर्यंत निव्वळ शून्य करण्याचा मनसुबा आहे.