एपीआय आणि ग्लेनमार्क तर्फे प्रत्येक महिन्याच्या १८ तारखेचा दिवस राष्ट्रीय बीपी स्क्रीनिंग दिवस म्हणून केला जाहीर

Admin

बीपी स्क्रीनिंग Glenmark

हृदयविकार व्यवस्थापनातील कौशल्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेडने (ग्लेनमार्क) आज गेटवे ऑफ इंडिया येथे टेक चार्ज एट १८ ही हायपरटेन्शन जागरूकता मोहीम सुरू केली. लवकर म्हणजे वयाच्या १८ व्या वर्षांपासूनच रक्तदाबाचे निरीक्षण करण्याचे महत्त्व पटवून देणे यावर या उपक्रमाचा भर आहे.

असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियातर्फे (एपीआय) प्रत्येक महिन्याची १८ तारीख टेक चार्ज एट १८ – बीपी स्क्रीनिंग दिवस म्हणून जाहीर करण्यात आली आहे. त्यायोगे हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी सर्व प्रौढांनी नियमित रक्तदाब तपासणी करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. ग्लेनमार्क आणि एपीआय यांच्या या सहयोगातून हायपरटेन्शन जनजागृती आणि निदान वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे.

गेटवे ऑफ इंडियावर या मोहिमेचे उद्घाटन दोन तासांच्या लक्षणीय ३डी व्हिडीओ प्रक्षेपणाने झाले. त्यामध्ये प्रारंभिक रक्तदाब निरीक्षणाचे महत्त्व प्रभावीपणे दर्शविले गेले. हायपरटेन्शनसंदर्भात जनजागृती आणि जनप्रबोधन करण्याची या मोहिमेची बांधिलकी जपत हे नाविन्यपूर्ण सादरीकरण लोकांना कृती करायला प्रवृत्त करणारे शक्तिशाली साधन बनले. विविध प्लॅटफॉर्मवरुन एक लाखांहून अधिक वैद्यकीय व्यवसायिकांपर्यंत पोहोचत या प्रभावी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. ग्लेनमार्कने या उपक्रमाच्या माध्यमातून १० कोटी भारतीयांना हायपरटेन्शनबद्दल जागरूक करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

ही मोहिम रक्तदाब निरीक्षणाला कोणत्या वयात सुरुवात करावी, योग्य वय कोणते असावे याबद्दलच्या जागरूकतेविषयी असलेली महत्त्वाची दूरी भरून काढते. सध्या अनेक तरुण प्रौढ हायपरटेन्शन[1] आणि हृदयविकाराचा झटका यांसारख्या त्याच्या जीवघेण्या गुंतागुंतीच्या धोक्यांना सामोरे जात आहेत. भारतीय तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर हा धोका वाढला आहे.

या मोहिमेबद्दल बोलताना ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेडच्या इंडिया फॉर्म्युलेशनचे अध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख श्री. अलोक मलिक म्हणाले, “ग्लेनमार्कमध्ये आम्ही भारतातील हायपरटेन्शन विरुद्धच्या लढाईत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि अर्थपूर्ण परिणाम साध्य करण्यासाठी दृढ बांधिल आहोत. विशेषतः तरुणांमध्ये हायपरटेन्शनच्या [2] त्रासाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने, सुरुवातीच्या वयापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

ही मोहिम लोकांचे प्रबोधन करण्यावर आणि त्यांच्या रक्तदाबाचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी त्यांना सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित करते. लवकर निदान आणि उपचार झाले तर भविष्यातील आरोग्याच्या समस्या कमी होऊ शकतात आणि जीवनमान उंचावू शकते. व्यापक जनजागृती प्रयत्नांद्वारे, आम्ही भारतातील आरोग्य सेवा पद्धतींमध्ये हायपरटेन्शन विषयक जनजागृतीला अग्रस्थानी ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.”

हा उपक्रम अलीकडील आयसीएमआर अभ्यासातून मिळालेल्या माहितीच्या आधारावर सुरू करण्यात आला आहे. त्यात वय २० वर्षे आणि त्यावरील भारतीयांमध्ये हायपरटेन्शनचे ३५.५ टक्के [3] प्रमाण दर्शविले आहे. विशेषतः शहरी लोकसंख्येमध्ये हेच प्रमाण ४०.७ टक्के इतके दिसून आले आहे.

२०२५ पर्यंत उच्च रक्तदाबाचे प्रमाण २५ टक्के [4] ने कमी करणे हे भारताचे एक राष्ट्रीय आरोग्य लक्ष्य आहे. ग्लेनमार्कची मोहिम म्हणजे व्यापक जागरूकता आणि सक्रिय आरोग्य व्यवस्थापनाला प्रोत्साहन देऊन या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

Leave a Comment