सिग्नेचर ग्लोबलचा ‘टायटॅनियम एसपीआर’ प्रकल्पाचे १२०३ कोटीं रुपयांचे बांधकाम कंत्राट ‘कॅपासिटे’ला…

Admin

सिग्नेचर ग्लोबल Signature Global

भारतातील आघाडीच्या बांधकाम व्यावसायिक कंपन्यांपैकी एक असलेल्या सिग्नेचर ग्लोबलने आपल्या गुरुग्राममधील सेक्टर ७१ येथील प्रीमियम गृहप्रकल्प असलेल्या टायटॅनियम एसपीआर या प्रकल्पासाठी बांधकामाचे कंत्राट बहाल केल्याची घोषणा केली आहे. हे १२०३ कोटी रुपयांचे कंत्राट प्रख्यात अशा कॅपासिटे इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड या बांधकाम कंपनीला देण्यात आले आहे.

टायटॅनियम एसपीआर हा प्रकल्प १४.३८२ एकरवर पसरला असून यात ३.५ बीएचके आणि ४.५ बीएचकेचे ६०८ युनिट्स असतील. हा प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये साकारण्यात येणार असून याची एकूण विक्री क्षमता ३७ लाख चौ. फुटांची आहे.

पहिल्या टप्प्यात २१ लाख चौ. फूट असून त्याचा आरंभ जून २०२४ मध्ये करण्यात आला आहे. या प्रकल्पाला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून विक्रीपूर्व २७०० कोटी रुपयांचा आकडा गाठण्यात आला आहे.

सिग्नेचर ग्लोबलचे अध्यक्ष आणि पूर्णकालीन संचालक श्री. प्रदीप अगरवाल म्हणाले, “टायटॅनियम एसपीआर हा जगण्याचा आलिशान अनुभव देण्याच्या आमच्या कटिबद्धतेचे उदाहरण आहे. आमच्या पहिल्या काही प्रीमियम प्रकल्पांपैकी एक असूनही ग्राहकांकडून याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे.

याच्या विकासामध्ये सर्वोच्च पातळीचा दर्जा कायम ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कॅपासिटे इन्फ्राप्रोजेक्ट्स यांच्या भागीदारीमध्ये टायटॅनियम एसपीआर हा दिल्ली एनसीआर प्रदेशात एक लँडमार्क म्हणून समोर येईल, असा आम्हाला विश्वास आहे. आधुनिक घर खरेदीदारांना यातून आलिशानता, आराम आणि सोय यांचा परिपूर्ण मिलाफ मिळेल.”

गुरुग्राममधील सदर्न पेरिफेरल रोडला (एसपीआर) लागून असलेल्या सेक्टर ७१ मध्ये मोक्याच्या जागी उभे राहणारा टायटॅनियम एसपीआर हा एक नमुनेदार विकास प्रकल्प असून प्रीमियम जीवनशैलीसाठी त्याची रचना करण्यात आली आहे. या प्रकल्पात २६ फूट आणि २८ फूट लांबीचे डेक असतील तसेच ट्रिपल हाईट एंट्रन्स लॉबी आणि सात लगून पूल असतील.

सिंगापूरमधील डीपीसी, अमेरिकेतील एमपीफपी,कन्फ्युएंस, एनएमपी डिझाईन, सेनेलॅक कन्सल्टंट्स आणि विन्टेक कन्सल्टंट्स अशा नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय आर्किटेक्ट्सनी त्याची रचना केली आहे.

सिंगापूरच्या वास्तुशैलीने प्रेरित असलेल्या टायटॅनियम एसपीआरमध्ये ४० मजली गगनचुंबी टॉवर्स असतील. त्यातून श्वास रोखून धरायला लावणारे शहराचे दृश्य दिसेल. कोणतीही बाल्कनी एकमेकांसमोर येणार नाही, असे त्याचे लेआउट्स आहेत.

उंचावरील हिरवाईच्या जागा, उदा. ३० व्या मजल्यावरील स्काय गार्डन आणि ४० व्या मजल्यावरील स्काय टेरेस, या विहंगम दृश्यांसह निवांत विश्रांती स्थळे पुरवतील. या प्रकल्पात ५५ पेक्षा जास्त विशेष सुविधांचा समावेश असून यात लगून पूल, सेन्सरी गार्डन, मियावाकी जंगल आणि अत्याधुनिक मनोरंजन सुविधा यांचा समावेश आहे.

यात डबल हाईट एंट्रीसह ५७,००० चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेला क्लब एलिव्हेट, तलावाच्या दर्शनी भागासह एक बहुउद्देशीय हॉल, उंची भोजनाचे पर्याय, एक पूर्ण सुसज्ज जिम, झुंबा स्टुडिओ, स्पा आणि सौना सुविधा, ऑन-साइट सलून, एक को-वर्किंग जागा आणि रहिवाशांसाठी इतर सामुदायिक जागा असतील. त्यामुळे येथे निवासी एन्क्लेव्हसह रिसॉर्टसारखे वातावरण तयार होईल.

सदर्न पेरिफेरल रोड हा राष्ट्रीय राजधानी क्षेत्राच्या सर्वात आशादायक स्थानांपैकी एक म्हणून सर्वसाधारणपणे ओळखला जातो. एसपीआरला लागून असलेल्या सेक्टर ७१ गुरुग्राम येथे प्राइम लँड पार्सल सिग्नेचर ग्लोबलच्या मालकीच्या असून त्यांची विकसनाची क्षमता १ कोटी ७० लाख चौरस फूट एवढी आहे.

Leave a Comment